शासकीय योजनांचा लाभ गरजूपर्यंत पोहचविणा-या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना मानधन वाढ मिळालीच पाहिजे. या संदर्भात आपण विधानसभेत आवाज उठविला असून मानधनात वाढ मिळण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी शिष्टमंडळाशी बोलताना दिली. यावेळी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे, सचिव सुवर्णा तळेकर आणि संघटक सुनिल बारवाडे उपस्थित होते.