इचलकरंजी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. विशेषतः मुख्य मार्गावर पडलेल्या खड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्ची पडत असताना शहराअंतर्गत रस्त्यांची दुरवस्था वाहनधारकांसाठी धोकादायक बनले आहेत. महापालिकेकडून रस्ते दुरुस्तीच्या कामाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त सामाजिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अंतर्गत रस्ते वाढत्या वाहतुकीमुळे अरुंद बनले आहेत.