Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी: रांगोळी-इचलकरंजी रस्त्यासाठी १८ कोटी मंजूर; आमदार प्रकाश आवाडे

रांगोळी-इचलकरंजी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणासाठी अठरा कोटी मंजूर झाले आहेत. रस्ता कामाची निविदा मंजूर होऊन कामास सुरुवात केली आहे. रांगोळी इचलकरंजी रस्ता रुंदीकरणाची अनेक वर्षाची मागणी होती. आमदार प्रकाश आवाडे यांनी रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता. रस्ता अरुंद असल्यामुळे अनेकवेळा अपघात होऊन हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला होता. त्यामुळे प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून अर्थसंकल्पीय बजेटमधुन रांगोळी इचलकरंजी रस्त्यासाठी अठरा कोटींचा निधी मंजूर होऊन कामास सुरुवात झाली.