इचलकरंजी शहरवासीयांना स्वच्छ व सात दिवस २४ तास पाणी मिळावे यासाठी नळांना मीटर बसवण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेकडून 'अमृत २' योजनेअंतर्गत शासनाकडे ५५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास शहरातील सुमारे ४५ हजार नळांना मीटर बसवण्यात येतील. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळणार असून नागरिकांना वेळेत व मुबलक पाणी मिळणार आहे. शहरात ५५ हजार मिळकतधारक आहेत. शहरात कृष्णा तसेच पंचगंगा नळपाणी योजनेद्वारे पाणी उचलून त्याचा पुरवठा केला जातो.