Logo
ताज्या बातम्या

ॲपलचे नवीन M3 चिप्स; MacBook Pro आणि iMac दोन नवीन व्हर्जन लॅपटॉप लाॅंच

ॲपल कंपनीचा काल 30 ऑक्टोबर रोजी Apple Scary Fast इव्हेंट पार पडला. या इव्हेटमध्ये ॲपलचे नवीन प्रोडक्टस् लाॅंच झाले. यामध्ये कंपनीने १४ इंच आणि १६ इंच डिस्प्लेसह नवीन MacBook Pro आणि iMac हे दोन नवीन व्हर्जन लॅपटॉप लाॅंच केले आहेत. हे दोन्ही लॅपटॉप नवीन चिपसेट M3, M3 Pro आणि M3 Max सह मार्केटमध्ये आणण्यात आले आहेत. हे सर्व मॉडेल्स दीर्घकाळ टिकणाऱ्या पावरफुल बॅटरीसह आणण्यात आले आहे. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. Apple MacBook Pro चे फीचर्स MacBook Pro लॅपटॉप मॉडेलमध्ये Liquid Retina XDR डिस्प्ले आहे. इनबिल्ट 1080p चा कॅमेरा आहे. या लॅपटॉपमध्ये इमर्सिव्ह सिक्स-स्पीकर साउंड सिस्टमसह कनेक्टिव्हिटीसाठी अनेक पर्याय आहेत. M3 Max सह नवीन MacBook Pro 128GB पर्यंत रॅम आहे. हे लॅपटॉप गेम चेंजिंग ग्राफिक्स परफॉर्मन्स प्रदान करतील. (Apple New Products) M3 चिप असलेला 14-इंच लांबीचा MacBook Pro लॅपटॉप M1 चिप असलेल्या MacBook Pro पेक्षा 60 टक्के वेगवान आहे. M3 Pro चिप असलेला 16-इंच लांबीचा MacBook Pro लॅपटॉप M1 Pro सह सुसज्ज असलेल्या 16-इंचाच्या MacBook Pro पेक्षा 40 टक्के वेगवान आहे. लॅपटॉपमध्ये पावरफुल बॅटरी आहे, जी 22 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देते. तसेच डिझाईनच्या बाबतीत विशेष बदल झालेला नाही, कंपनीचे मेन फोकस चिपसेटवर आहे. Apple MacBook Pro ची भारतात किंमत M3 चिप असलेला 14-इंचाचा MacBook Pro हा केवळ दैनंदिन कामांसाठीच नाही तर, हा ॲप्स आणि गेम्ससाठी देखील चांगला लॅपटॉप आहे. याची सुरुवातीची किंमत 1,69,900 रुपये आहे. M3 Pro आणि M3 Max MacBook Pro हे मॉडेल स्पेस ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहेत. तर, M3 Pro आणि M3 Max मॉडेल सिल्वर कलरमध्ये उपलब्ध आहेत आणि M3 सह 14-इंच लांबीचा MacBook Pro सिल्व्हर आणि स्पेस ग्रे कलरमध्ये येतो. (Apple Scary Fast Event 2023 Launch) प्री-ऑर्डर सर्व मॉडेल्स आजपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. Apple India च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही त्यांना प्री-बुक करू शकता. लॅपटॉप 7 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील.