इचलकरंजी येथील वखारभागमध्ये असलेल्या एका प्रोसेसमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना आगीचा भडका उडाला. वेळीच सतर्कता दाखवत अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. वखारभाग परिसरात जुनी अरविंद प्रोसेस सध्या अन्य एकाने भाडेतत्त्वावर घेतली आहे. याठिकाणी स्क्रॅप टेम्पोचे वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी ऑईल आणि डिझेल मोठ्या प्रमाणात सांडले होते. ठिणगी पडल्याने क्षणार्धात आगीचा भडका उडाला. तातडीने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.