इचलकरंजी येथील पंचगंगा नदीघाट परिसरात उभारण्यात आलेल्या सुर्यनारायण मंदिरात श्री सुर्यदेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे आणि सौ. किशोरी आवाडे यांच्या हस्ते होमहवन आणि धार्मिक विधी करण्यात आले. तर डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले. यावेळी स्वप्निल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, नरसिंह पारीक, राजवर्धन नाईक-निंबाळकर, अरविंद शर्मा यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.