राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन इचलकरंजी शहराजवळील कोरोची गावातील मैदानावर रविवार, दि. ३ मार्च रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचा लाभ महिला लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात अंमलबजावणी यंत्रणांचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्यांनी घेतला.