इचलकरंजी येथील शांतीनगर परिसरातील यंत्रमाग कारखान्यात विजेचा धक्का बसून कामगाराचा मृत्यू झाला. सुरेश राजाराम कांबळे (वय 55 रा. शांतीनगर) असे मृताचे नांव असून या प्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शांतीनगर परिसरात राहुल बिळगीकर यांचा यंत्रमाग कारखाना आहे. याठिकाणी सुरेश राजाराम कांबळे हे काम करत असताना कांबळे यांना विजेचा जोराचा धक्का बसला. बिळगीकर यांनी तातडीने कांबळे यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिका-यांनी सांगितले.