Logo
ताज्या बातम्या

कोल्हापूर : जिल्ह्यात पिण्यास अयोग्य पाण्याचा टक्का वाढतोय

पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी अयोग्य असल्याच्या टक्केवारीचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे. यावर्षी पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्याची टक्केवारी तीनवर गेली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात तपासण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ५० ठिकाणच्या पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य आढळून आले आहे. पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याचे प्रमाण वाढत आहे. राधानगरी तालुक्यातील काही गावांमधील साथीचा उद्रेक थांबतो न थांबतो तोच भुदरगड तालुक्यातील कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील काही गावांमध्ये साथीचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्यात सर्वच गावांना नदीतून पाणीपुरवठा होऊ शकत नाही. काही गावांमध्ये विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. पाण्यामुळे निर्माण होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गावाला पुरवठा होणाऱ्या पाण्याचे काही ठिकाणचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात. या अहवालामध्ये पिण्यास पाणी अयोग्य असल्याची टक्केवारी वाढत असल्याचे दिसून येते.फेब्रुवारीचा अहवाल एप्रिल महिना निम्मा संपत आला तरी आरोग्य विभागात अद्याप तयार झालेला नाही. या महिन्यात पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्याची टक्केवारी ३ टक्क्यांच्या वर गेली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वर्षभरातील पिण्यास आयोग्य असलेल्या पाण्याची टक्केवारी महिना एप्रिल – ३ टक्के मे- २.३ टक्के जून – १.५ टक्के जुलै – २.७ टक्के ऑगस्ट – १.९ टक्के सप्टेंबर – १.६ टक्के ऑक्टोबर -२.७ टक्के नोव्हेंबर -१.५ टक्के डिसेंबर -२.६ टक्के जानेवारी – ३.०० टक्के