Logo
ताज्या बातम्या

तुरुंगात कैद्यांसाठी स्मार्टकार्ड फोन सुविधा

कैद्यांना आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी तुरुंगात असलेली कॉईन बॉक्स फोन सुविधा बंद होणार असून, त्याऐवजी राज्यातील सर्व तुरुंगांत आता स्मार्टकार्ड फोनची सुविधा मिळणार आहे. यामुळे कैद्यांना कुटुंबीयांशी मनमुराद संवाद साधण्यास सोपे होणार आहे. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेला हा प्रयोग आता राज्यातील सर्व तुरुंगांत सुरू केला जाणार आहे. या सुविधेला गृह विभागाने मंजुरी दिली आहे. अप्पर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे प्रायोगिक तत्त्वावर स्मार्टकार्ड फोन सुविधा सुरू करण्याची शिफारस केली होती. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता सर्व तुरुंगांत स्मार्टकार्ड फोन सुविधा सुरू करण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे.