सध्याच्या जगात मोबाईल ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाली आहे. त्यातच मोबाईलमधील सिमकार्ड ही त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्याशिवाय मोबाईलचा वापर करताच येत नाही. पण 1 जानेवारी 2024 पासून मोबाईल मधील सिम कार्ड खरेदी करण्याच्या नियमांत बदल होणार आहेत. याविषयी आधीही माहिती देण्यात आली होती, आता पुन्हा एकदा याविषयी माहिती देण्यात आलीये. ज्यामध्ये आता युजर्सना KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
खरंतर टेलिकम्युनिकेशकडून सांगण्यात आले होते की, येत्या 1 जानेवारीपासून पेपर बेस्ड 1 KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यामुळे बनावट सिम कार्ड खरेदी करण्यावर आळा बसण्यास मदत होईल असं देखील सांगण्यात आलं आहे.
सिम सेल पॉइंट माहिती देखील उपलब्ध असेल
वास्तविक, 1 जानेवारीपासून बदल होणार्या नियमांनुसार, सिम सेल पॉइंटविषयी देखील माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे जर भविष्यात कोणी सिम कार्डबाबत काही अनधिकृत घटना घडली तर त्याबाबत सिम सेल पॉइंटच्या माध्यमातून माहिती मिळवण्यास मदत होणार आहे.
सेलर किंवा एजेंट्सना देखील करावे लागणार रजिस्ट्रेशन
नव्या नियमांनुसार आता सरकारकडून टेलिकॉम कंपन्यांकडून फ्रेंचायजी, डिस्ट्रीब्युटर्स आणि सिम सेल पॉइंट यांविषयी देखील नियम जारी करण्यात आले आहेत. त्याबाबत आता रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असणार आहे. हा माहिती मीडिया रिपोर्टनुसार देण्यात आली आहे. तसेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी 12 महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.
सायबर गुन्ह्यांमध्ये होत आहे सातत्याने वाढ
सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच अनेक नवीन प्रकरणं देखील समोर येत आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येतायत. हल्ली कोणत्याही अनोळखी नंबरवरुन लोकांना मसेज किंवा कॉल येतात. त्यानंतर लोकांच्या बँक खात्यातून रक्कम गायब होते. त्यामुळे या सगळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सिम कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव वर्षात 'या' लोकांचे युपीआय आयडी होणार बंद
जर तुम्ही यूपीआय ॲप्स वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जीपे, पेटीएम , फोनपे आणि भारतपे सारख्या सर्व यूपीआय पेमेंट ॲप्सना इनॲक्टिव्ह युपीआय खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी गेल्या वर्षभरापासून यूपीआय आयडीचा वापर केला नाही त्यांची यूपीआय खाती बंद करण्यात येणार आहेत. 31 डिसेंबरनंतर सर्व कंपन्या अशी खाती बंद करण्यास सुरुवात करणार आहे.