प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका सभागृहात करण्यात आले. इचलकरंजी महापालिके अंतर्गत सर्वांसाठी घरे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या केंद्र शासन पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी २०१६ पासून सुरू आहे. योजनेच्या घटक क्रमांक ४ वैयक्तिक लाभार्थी अनुदान अंतर्गत इचलकरंजी महापालिकेसाठी केंद्रीय मंजुरी तथा सनियंत्रण समितीद्वारे मंजूर एकूण ६ सविस्तर प्रकल्प अहवालातील ५२९ मंजूर लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम प्रगतिपथावर आहे.