Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :स्वामी मळा येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरी, शिवाजीनगर पोलिसात नोंद

इचलकरंजी येथे घरफोडी. एक लाख 52 हजाराचा मुद्देमाल लंपास. इचलकरंजी शहरातील स्वामी मळ्यातील बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील तिजोरी फोडून त्यामध्ये एक लाख रुपयेची रोखड 52 हजार 300 रुपये किमती सोन्या चांदीचे दागिने असा एक लाख 52 हजार 300 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या प्रकरणाची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली असून त्याची फिर्याद सुनील आदलकर यांनी दिली आहे.