इचलकरंजीमध्ये पाण्याची समस्या खूपच भेडसावत आहे. अपुरा पाऊस यामुळे पाण्याची टंचाई इचलकरंजीवासियांना भासत आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे महापालिकेने पाणी उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचगंगेच्या प्रदूषणामुळेही अनेकवेळा पाणी उपसा बंद केला जातो, तर कृष्णा योजनेच्या गळतीमुळे पाणीपुरवठा ठप्प होतो. जानेवारी महिन्यात पाणी उपशाची ही परिस्थिती असेल तर मार्च नंतर पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.