बँक ते पोलीस भरती या सगळ्या विभागांत बंपर भरती सुरु आहे. सगळ्या विभागांसाठी पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीखसुद्धा वेगळी आहे. तुम्ही वेगवेगळ्या विभागाच्या तारखा आणि पात्रता अधिकृत वेबसाइटवर चेक करू शकता. तेव्हा तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते वेळेत चेक करून लगेच अर्ज करा. परीक्षा आणि पदांबाबत सविस्तर जाणून घेऊयात.बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये क्रेडिट ऑफिसरची पदे रिक्त असून एकूण १०० पदे भरण्यात येणार आहे. यात ५० पदे क्रेडिट ऑफिसर स्केल II चे आहेत तर ५० पदे क्रेडिट ऑफिसर स्केल III चे आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रच्या bankofmaharashtra.in. या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अर्जाची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर असेल. अर्जासाठी ११८० रुपये शुल्क असेल.
छत्तीसगड पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२३
छत्तीसगड पोलीससाठी एकूण ६००० पदांची भरती आहे. अर्जासाठी शेवटची तारीख ३० नोव्हेंबर असणार आहे. यासाठी cgpolice.gov.in या अधिकृत वेबसाइटला तुम्ही भेट देऊ शकता. या पदासाठी ५वी ते १०वी उत्तीर्ण उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात. यात वयोमर्यादा १८-२७ वर्षे आहे.एमपी एनएचएम भरती २०२३
नॅशनल हेल्थ मिशन, एमपी मध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या पदासाठी भरती सुरु आहे. यात एकूण ९८० पदांची भरती होणार असून अर्जाची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर आहे. अर्जासाठी तुम्हाला nhmmp.gov.in. या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.