Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : अनुज्ञेय अनुदानाचे वितरण

इचलकरंजी महापालिकेकडून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घटक क्रमांक चारमधील आतापर्यंत 529 घरकुले मंजूर करण्यात आले आहेत. त्या पैकी 380 पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल पूर्ण झाले आहेत. तर 149 घरकुले पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत. त्यानुसार पात्र घरकुल लाभार्थ्यांना 1 कोटी 41 लाख रुपये इतके अनुज्ञेय अनुदानाचे वितरण करण्यात आले. घरकूल पूर्ण केलेल्या धोंडीराम पाटील, रेखा हत्तरसंग, रफिक गवंडी यांना निधी वितरण पत्र आयुक्त दिवटे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.