Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : इचलकरंजीत सांडपाण्याचा प्रश्न गंभीर

पंचगंगा नदीतील तेरवाड बंधाऱ्याजवळ मासे मृत्युमुखी पडल्यानंतर इचलकरंजीतील सांडपाण्याचा प्रश्न चर्चेत आला आहे. सध्या शहरात दररोज सुमारे ३८ एमएलडी सांडपाणी तयार होते. प्रत्यक्षात मात्र प्रक्रिया करणारा २० एमएलडी क्षमतेचा एसटीपी प्रकल्प सध्या कार्यान्वित आहे. तो पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याच्या सातत्याने तक्रारी होतात. सध्या महापालिकेकडून १८ एमएलडी क्षमतेच्या दुसऱ्या एसटीपी प्रकल्प उभारणीचे काम गतीने होत आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर इचलकरंजीतील सांडपाण्याचा किमान प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.