Logo
ताज्या बातम्या

भारतातून युरोपसाठी होणारा डिझेल पुरवठा 90 टक्क्यांनी घटला

भारतातून युरोपसाठी होणारा डिझेल पुरवठा गेल्या दोन वर्षांपासून नीचांकी पातळी म्हणजे 90 टक्क्यांनी कमी झाला आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, लाल समुद्रात सातत्याने हुती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर गंभीर परिणाम झाला आहे. आशियातून युरोपीय संघ आणि ब्रिटनला जाणार्‍या कार्गो कंपनी जहाजांचे दरही वाढवले आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत रोज सुमारे 18 हजार बॅरेल डिझेल युरोपला पोहोचले. जानेवारीच्या तुलनेत ही सरासरी 90 टक्क्यांनी घटली आहे. युरोप अथवा अटलांटिक महासागरातून जाणार्‍या डिझेल टँकरना हुती बंडखोरांच्या भीतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून जावे लागत आहे.