Logo
ताज्या बातम्या

भारतातील पर्यटकांसाठी खुशखबर! 'मे २०२४' पर्यंत थायलंडमध्ये 'व्हिसा फ्री' प्रवेश

भारत आणि तैवानमधून येणाऱ्या पर्यंटकांसाठी थायलंड सरकारने खास ऑफर दिली आहे. थायलंडमधील एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून मे २०२४ पर्यंत या दोन्ही देशातील नागरिक पर्यंटक व्हिसाशिवाय थायलंडमध्ये प्रवेश करू शकतात. पर्यटनाचा हंगाम जवळ आल्याने या दोन्ही देशातील अधिक पर्यटकांनी आकर्षित करण्याचा प्रयत्न थायलंड सरकारकडून केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, थायलंड सरकार भारत आणि तैवानमधील पर्यटकांसाठी व्हिसा नियम शिथिल करण्याच्या शक्यतेचा शोध घेत आहे. ज्यामध्ये थायलंडमध्ये ‘व्हिसा फ्री’ प्रवेश आणि पर्यटकांच्या राहण्याच्या कालावधी वाढवणे याचा समावेश आहे. यामाध्यमातून थायलंडमधील पर्यटनाला चालना देत, उत्पादन वाढीसाठी थायलंड कडून प्रयत्न केले जात आहे. असे संबंधित अधिकाऱ्यांने म्हटले आहे. पर्यटनातून देशाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे हा देखील उद्देश तुम्ही देखील येत्या हंगामात थायलंडला जाण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण यापुढे मे २०२४ पर्यंत थायलंडला जाण्यासाठी कोणत्याही भारतीय आणि तैवानमधील नागरिकांना यलंडला जाण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही. भारत आणि तैवानमधून येणाऱ्या लोकांसाठीच व्हिसाची आवश्यकता माफ केली जाईल, असे थायलंडच्या सरकारी प्रवक्त्याने म्हटले आहे. थायलंडच्या नवीन सरकारचे पुढील वर्षीपर्यंत परदेशी पर्यटकांकडून ३.३ ट्रिलियन थाई बातपर्यंत आर्थिक उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये ट्रॅव्हल इंडस्ट्री ही सर्वोत्तम अल्पकालीन आर्थिक उत्पादन देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे थायलंड सरकारने ट्रॅव्हल इंडस्ट्रीवर फोकस केला आहे. बँक ऑफ थायलंडच्या आकडेवारीनुसार, थायलंडच्या एकूण जीडीपीमध्ये पर्यटनाचा सुमारे १२% वाटा आहे, असेही थायलंडच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.