सरकारी नोकरीच्या शोधात असला, तर ही माहिती लक्ष देऊन वाचा. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद मध्ये नोकरीची संधी आहे. या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून उमेदवारांचे अर्ज मागण्यात आले आहे. या भरती अंतर्गत स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, पंचकर्म थेरेपिस्ट यासह विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार aiiarecruitment.org या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
रिक्त पदांचा तपशील
या भरतीअंतर्गत स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, सायंटिस्ट, रिसर्च असिस्टेंट यासह इतर विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे 140 पदांवर भरती करण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता
या भरतीअंतर्गत पात्र उमेदवार पदानुसार, बारावी (HSC) ते पीएचडी (Phd) पदवी असणं आवश्यक आहे. पात्रता आणि निकषांबद्दल अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहावी.
वयोमर्यादा
उमेदवारासाठीची वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी ठरवण्यात आली आहे. यामध्ये ओबीसी वर्गातील उमेदवाराला वयोमर्यादेत तीन वर्षांची सवलत आणि SC/ST वर्गातील उमेदवाराला पाच वर्षांची सवलत देण्यात येईल.
अर्ज फी
गट A पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांना रुपये 1000 जमा करावे लागतील आणि SC/ST श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये जमा करावे लागतील. याशिवाय, गट ब पदांसाठी फॉर्म भरण्यासाठी, सामान्य / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये आणि SC / ST श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपये शुल्क जमा करावे लागेल.
अर्ज कसा दाखल करायचा?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला आधी aiiarecruitment.org या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.
अधिकृत वेबसाइटच्या होम पेजवर, तुम्हाला आधी लॉग इन लिंकवर क्लिक करावं लागेल.
आता येथे Create Account वर क्लिक करून तुमचं खातं तयार करा.
यानंतर लॉगिन तपशील प्रविष्ट करा.
आता तुमची सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करा.
उमेदवारांना शुल्क जमा करावं लागेल.
यानंतर भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यावी.