Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी गंगामाईच्या खेळाडूंची निवड

बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषक व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल संघामध्ये इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये समीक्षा काशिलिंग मिठारी, रोझा समीर कलावंत, अनन्या अमोल मळोद, श्रावणी प्रमोद रवंदे, सादिया जमालशाह फकीर यांचा समावेश आहे. सर्व खेळाडूंना क्रीडाविभाग प्रमुख प्रा. शेखर शहा, क्रीडाशिक्षक डॉ. राहुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.