इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन, ताराराणी पक्ष व राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य यंत्रमागधारक समस्या कमिटीचे सदस्य आमदार प्रकाशराव आवाडे यांची भेट घेतली. यावेळी राज्य शासनाने जाहीर केलेल्या वस्त्रोद्योग धोरणामध्ये आवश्यक असणारी अतिरिक्त वीज दर सवलत, ५% व्याज सवलत, वीज बिलातील पोकळ थकबाकीवरील व्याज व दंड निर्लेखीत करणे, मल्टीपार्टी वीज कनेक्शन पुन्हा सुरू करणे, सध्या अस्तित्वात असलेल्या शटललेस लुमला सवलती देणे या व इतर मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.