Logo
ताज्या बातम्या

सीईटीच्या अभ्यासाला लागा : वेळापत्रक जाहीर

व्यावसायिक अभ्यासक्रमांना पुढील वर्षी प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आतापासूनच परीक्षांची तयारी करता यावी यासाठी 19 अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी)चे संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता प्रत्यक्ष नोंदलीलाही नव्या वर्षाच्या प्रारंभीच सुरुवात केली आहे. यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 वर्षाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत जानेवारीतच विद्यार्थ्यांना आपला अर्ज भरता येणार आहे. सीईटी परीक्षांना 2 मार्च पासून सुरूवात होणार आहेत. पहिली बीएड आणि एमएड तीन वर्ष एकत्रित वर्षाला प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांची सीईटी होणार आहेत. 18 परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. 10 जानेवारीपासूनचे सविस्तर वेळापत्रक सीईटीने जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना सुमारे अर्ज भरण्यासाठी 20 ते एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे. तब्बल पाच लाखाहून अधिक विद्यार्थी नोंदणी होणार्‍या एमएचटी-सीईटी परीक्षा 16 ते 30 एप्रिल दरम्यान होणार आहे. यंदा प्रथमच बी-प्लॅनिंगची सीईटी होणार नाही तर हे प्रवेश एमएचटी सीईटीतील गुणांच्या आधारे होणार आहेत. तर नर्सिंग प्रवेशासाठी एएनएम,जीएनएम ही परीक्षा सीईटी सेलकडून घेतली जाणार आहे. एमएचटी-सीईटी 16 ते 30 एप्रिल मध्ये आहे. या परीक्षेचा अर्ज 16 जानेवारीपासून भरता येणार आहे. यंदा ही परीक्षा गतवर्षीच्या तुलनेत 22 दिवस ही परीक्षा अगोदर नियोजन केले आहे. गतवर्षी 9 ते 20 मे या कालावधीत 24 सत्रात परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला 3 लाख 54 हजार 573 मुलांनी तर 2 लाख 81 हजार 515 मुलींनी नोंदणी केली होती. असे 6 लाख 36 हजार 089 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.बारावी परीक्षा संपल्यानंतर सीईटी वेळेत व्हावी आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी नोंदणी आणि परीक्षेचे नियोजन अगोदरच जाहीर केल्याची माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली. अभ्यासक्रम एकूण जागा बीई, बी टेक -143413 एमबीए – 43506 एमसीए – 10456 बी. एचएमसीटी – 892 बी. आर्च – 4878 विधी 3 वर्ष – 18425 विधी 5 वर्ष – 11883 बीएड – 36159 एमएड – 2881 बीपीएड – 6060 एमपीएड – 982 ( या जागांत यावर्षी बदल होण्याची शक्यता) गतवर्षीचेे अर्ज एमबीए/एमएमएस – 114902 एमसीए – 33139 बीए, बीएस्सी, बीएड – 683 बीएडएमएड – 990 विधी 5 वर्ष – 19295 बी.एचएमसीटी – 783 बी.प्लॅन – 75 एमपीएड – 1633 बी. एड ईएलसीटी – 72479 एएसी सीईटी – 3047 एम.आचषसीईटी – 539 बी. डिझाइन – 436 विधी 3 वर्ष – 64138 बीपीएड सीईटी – 7596 एमएचटी पीसीएम – 313732 एमएचटी पीसीबी – 277403 एम. एड – 2155 एकूण – 913016