Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :जीतो लेडीजवे यांच्या वतीने 12 व 13 जानेवारी रोजी उडान मेगा फेस्टिवलचे इचलकरंजीत आयोजन, पत्रकार बैठकीत माहिती

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्यावतीने बारा आणि तेरा जानेवारी असे दोन दिवस छोट्या छोट्या उद्योगांना प्राधान्य देण्यासाठी उडान मेगा शॉपी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जीतो लेडीजवे च्या अध्यक्ष सोनू जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या लेडीजवे ही एक सामाजिक संस्था असून ती दोन वर्षापासून कार्यरत आहे. प्रारब्ध पासून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, संस्कृतीक अशा अनेक क्षेत्रात ही संघटना कार्यरत आहे. छोट्या उद्योजकांना प्राधान्य देण्यासाठी उडान मेगा शॉपी फेस्टिवलच्या आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महीलांसाठी विविध आकर्षक आणि आगळ्यावेगळ्या स्पर्धेत आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात इचलकरंजी, सांगली कोल्हापूर, मिरज, हैदराबाद, जयपूर, लखनऊ, मुंबई, पुणे, चेन्नई, सोलापूर आदी विविध शहरातुन अनेक नाविन्यपूर्ण वस्तूंचे स्टॉल असणार आहेत. त्याचबरोबर विविध खाद्यपदार्थांचा सुंदर खजाना ही एका छताखाली असणार आहे. या प्रदर्शनामध्ये लकी ड्रॉ काढण्यात येणार असुन दुपारी तीन ते चार या हॅपी हावर्स मध्ये सर्वांना मोफत प्रवेश मिळणार आहे. महिलांसाठी मीन्स अँड मिसेस संक्रांत शॉपिंग बॅग सोबत सेल्फी फोटो आणि पतंग सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या प्रदर्शनातून लकी ड्रॉ काढण्यात येणार असून यामध्ये एका कुटुंबासाठी एक रात्र आणि दोन दिवस अशी गोवा ट्रिप विजेत्याला मिळणार आहे. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.