देशातील सर्व ११ टेक्स्टाईल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलतर्फे नवी दिल्ली येथे २५ ते २९ फेब्रुवारीदरम्यान मेगा टेक्स्टाईल शो 'भारत टेक्स २०२४' चे आयोजन केले आहे. या ग्लोबल टेक्स्टाईल एक्स्पोच्या प्रसार आणि प्रचारासाठी पॉवरलूम डेव्हलपमेंट अॅन्ड एक्स्पोर्ट प्रोमोशन कौन्सिल अर्थात पिडीक्सिलतर्फे इचलकरंजीत शनिवारी (ता. ६) रोड शोचे आयोजन केले आहे, अशी माहिती पिडीक्सिलचे अध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.