Logo
ताज्या बातम्या

'आदित्य एल-१'कडून आता डेटाची प्रतीक्षा : इस्रो अध्यक्षांची माहिती

भारताची महत्त्वपूर्ण सौरमोहिम आदित्य एल-१ संदर्भात इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी आज (दि.११) महत्त्वाची अपडेट दिली आहे. सोमनाथ यांनी आज (दि.११) गुजरात येथे माध्यमांशी बोलताना, आदित्य एल-१ हे अंतराळयान सुस्थितीत असून, आता डेटाची प्रतीक्षा असल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेनिमित्त ISRO चे अध्यक्ष एस. सोमनाथ गुजरातमधील गांधीनगर येथे उपस्थित होते. सोमनाथ यांनी म्‍हटलं आहे की, आदित्य एल-१ आधीच लॅग्रेंज पॉइंटवर पोहचला आहे. तसेच तो हॅलो ऑर्बिटच्या कक्षेत फिरत आहे. आदित्य एल-१ ने काही प्राथमीर निरीक्षणे पाहण्यास सुरूवात केली आहे. या संबंधित घोषणा अजूनही बाकी आहे, त्यामुळे आम्ही आदित्य एल-१ ने नोंदवलेल्या निरीक्षणाच्या डेटासह परत येऊ. सौरमोहिमेच्या यशाने भारताने नवीन इतिहास रचला भारताची सौरमोहिम ‘आदित्य एल-१’ ने ६ जानेवारीला महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असेल्या हॅलो आॉर्बिटमध्ये प्रवेश केला. तसेच पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या लॅग्रेंज पॉईंट-१ (L1) वर ऐतिहासिक झेप घेत या पॉइंटवर स्थिरावले. या लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) वर सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल समान आहे. त्यामुळे याठिकाणाहून सूर्याची निरीक्षणे नोंदवणे या उपग्रहाला सहज शक्य आहे. या मोहीमेच्या यशामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो आणि भारताने अवकाश संशोधनात नवीन इतिहास रचला आहे.