Logo
ताज्या बातम्या

पुढील 24 तासांत महाराष्ट्रासह काही राज्यात पावसाची शक्यता, IMD ने या भागात वर्तवला पावसाचा अंदाज

देशात कुठे थंडी (Winter) तर कुठे पावसाची (Rain) रिमझिम असं वातावरण पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्रासह देशात काही भागात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यासह काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात थंडी आणि धुके (Cold Weather) पाहायला मिळत आहे. दरम्यान, वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे राज्यासह देशात काही ठिकाणी आज पावसाची हजेरी (Rain Prediction) पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळेल. तर, बहुतांश भागात कोरडं वातावरण राहण्याचा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. 21 आणि 22 फेब्रुवारीला पावसाची शक्यता आयएमडी (IMD) च्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश, राजस्थान आणि आसपासच्या इतर राज्यांमध्ये 21 फेब्रुवारीला पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळणार आहे. दरम्यान, देशात 22 फेब्रुवारीपर्यंत विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 21 आणि 22 फेब्रुवारीदरम्यान उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाखमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. डोंगराळ भागात बर्फवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत असताना मैदानी भागात पावसाची हजेरी लागल्याने हवामान बदललेलं पाहायला मिळत आहे. उत्तर-पश्चिम भारतातील काही भागात पुढील 2 दिवस पाऊस आणि गारपीट सुरू राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. यएमडीच्या अंदाजानुसार, 21 फेब्रुवारी रोजी पश्चिम हिमालयीन भागात मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव आणि वायव्य भारताच्या मैदानी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत राज्यातही पावसाची हजेरी वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशासह राज्याच्या हवामानात बदल पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातही पुढील 24 तासांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातही आज पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये कोरडं हवामान कायम राहील. मुंबईच्या हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. राज्यात कोकण वगळता काही भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.