इचलकरंजी शहरात गटारींची नियमित स्वच्छता होत नसल्याने सांडपाण्याला दुर्गंधी सुटून चिकुनगुनिया, मलेरिया यासारखे साथीचे आजार फैलावण्याचा मोठा धोका वाढला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने तातडीने यंत्रणा कार्यान्वित करुन शहरात नियमित कचरा उठाव व गटारींची स्वच्छता करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. याकडे महापालिका प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार नसेल तर नागरिकांना सोबत घेऊन लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.