Logo
ताज्या बातम्या

सीबीएसईच्या १०वी, १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; इथे पहा डेटशीट...

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु होणार असून १० एप्रिलपर्यंत चालणार आहेत. जवळपास ५५ दिवस या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बोर्डाच्या परीक्षांची डेटशीट जारी करताना सीबीएसईने काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. दोन विषयांमध्ये पुरेसे अंतर असावे, इयत्ता 12वीची डेटशीट तयार करताना जेईई मेन परीक्षा लक्षात ठेवली आहे. हे टाईमटेबल तयार करताना दोन विषयांच्या परीक्षा एकाच तारखेला होऊ नयेत, हे देखील ध्यानात ठेवण्यात आले आहे. परीक्षेची वेळ सकाळी 10:30 पासून असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची चांगली तयारी करता यावी यासाठी परीक्षेच्या दोन महिने आधी डेटशीट जारी करण्यात आली आहे.