Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : महानगरपालिकेला प्रदूषक नियमक मंडळाची 72 लाखांची दंडात्मक कारवाईची नोटीस, पंचगंगा नदीत मिसळले केमिकल युक्त पाणी

इचलकरंजी प्रदूषण मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांचे प्रयत्न सुरू असतानाच इचलकरंजी परिसरातील इंडस्ट्री एरियातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी व केमिकल युक्त पाणी इचलकरंजी पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी प्रोसेस नियमक मंडळाकडे तक्रार केली होती. याबाबत महानगरपालिकेने कोणतीही उपाययोजना न केल्याने प्रदूषण नियमक मंडळाने इचलकरंजी महानगरपालिकेला 72 लाख रुपयांची दंडात्मक कारवाईची नोटीस आज बजावली आहे. परिणामी सदर दंड आठ दिवसात न भरल्यास पुढील कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याचे ही त्या नोटीसमध्ये म्हटले असल्याची माहिती मिळाली आहे. परिणामी इचलकरंजी प्रदूषण मुक्त करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करत असल्याचे सर्वत्र चित्र दिसत आहे.