इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेल्या सुळकूड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आठ दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात मिटिंग आयोजित करण्यात येईल व मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन चंद्रकांतदादा पाटील यांनी इचलकरंजी सुळकुड पाणीयोजना कृती समितीच्या सदस्यांना दिले. माजी आमदार सुरेश हाळवणकर व विद्यमान आमदार प्रकाश आवाडे, अनिल डाळ्या, विनोद कांकाणी, विजय जगताप, रसूल नवाब, सुनील बारवाडे, उमेश पाटील, अमित बियाणी, उदयसिंह निंबाळकर, अमोल ढवळे, विद्यासागर चराटे, कौशिक मराठे, अभिजीत पटवा आदी उपस्थित होते.