इचलकरंजी, येथे सुरु असलेल्या १०८ कुंडीय गणपती महायज्ञनिमित्त पाचव्या दिवशी गोमाता पूजनासह महापुराण कथनावेळी गणेश जन्मोत्सव सोहळा झाला. कैलासचंद्र जोशी यांच्या सुमधूर वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले. फुलांची उधळण, लाडू वाटप करीत जन्मोत्सव साजरा केला. महायज्ञ सोहळ्यामध्ये सकाळी नियमितपणे गो पुजन केले जाते. यातून गोमातेचे महत्व विषद करण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवाच्या अंत: करणात प्राणीमात्रांसाठी आदर असला पाहिजे. भारतीय संस्कृती मानवाला पूर्ण सृष्टीवर प्रेम करावयास शिकविते.