Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :येथील इंदिरा नगर येथे अज्ञातने तोडलेल्या झाडांमुळे विद्युत तारा तुटुन 30 हजारांचे नुकसान, शहापूर पोलिसांत नोंद

इंदिरानगर कोरोची येथे अज्ञातनं तोडलेल्या झाडाच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून त्यामध्ये महावितरण कंपनीचा 30000 रुपयांचा नुकसान झाले आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी वायरमन ओंकार राजेंद्र सूर्यवंशी वय 31 राहणार कोरोची याने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी 24 डिसेंबर रोजी फिर्यादी ओंकार सूर्यवंशी याला फोन करून मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे एका विद्युत वाहिनी तारेवर झाड पडून तारा तुटली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सूर्यवंशी सहकार्यांसह तेथे गेले. व त्यांनी भागातील वीजपुरवठा खंडित केला. घटनास्थळी जाऊन पाहणी करता एका झाडाची फांदी कोणीतरी तोडल्याचं व ती फांदी तारेवर पडून चार पैकी दोन तारा तुटल्याचा दिसून आल. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांना देऊन सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदरच्या फांद्या बाजूला करून तारा जोडून विद्युत पुरवठा सुरू केला. फांदी पडून चार वीज मीटरचे डिस्प्ले व तुटलेल्या तारा व त्यासाठीचा खर्च असे 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.