बँक ऑफ बडोदामध्ये भरतीसाठी अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. बँकेने सीनिअर मॅनेजर पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ही भरती रेग्युलर बेसिसवर आधारित आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारा बँक ऑफ बडोदामध्ये अधिकृत वेबसाइटच्या माध्यामाने अर्ज करू शकते आहे. बँक ऑफ बडोदामध्ये भरतीसाठी अर्ज करण्यासाठी २६ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत दिली आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत सिनिअर मॅनेजरच्या एकूण २५० पदांवर भरती केली जाऊ शकते.
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था अथवा विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह बॅचरल पदवीधर असावा.त्यातबरोबर रिलेशनशिप किंवा क्रेडिट मॅनेजर क्षेत्रात आठ वर्षांचा अनुभव असला पाहिजे.
वयोमर्यादा
१ डिसेंबर २०२३ मध्ये उमेदवाराचे कमीत कमी वय २८ आणि जास्तीत जास्त वय ३७ असले पाहिजे. जास्तीच्या वयोमर्यादेत आरिक्षच वर्गातील उमेदवारांना सुट देण्यात आली आहे
अर्ज शुल्क
सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना कर आणि पेमेंट गेटवे शुल्कासह ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, PWD आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना कर आणि पेमेंट गेटवे शुल्कासह१ ०० रुपये भरावे लागतील. अर्जाची फी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल.
निवड प्रक्रिया
BOB पात्र उमेदवारांची ऑनलाइन चाचणी, गट चर्चा आणि मुलाखतीद्वारे भरती करेल. ऑनलाइन चाचणी इत्यादींची माहिती बँकेकडून वेळेत दिली जाईल.