वस्त्रनगरी इचलकरंजी येथील पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाचा ४०० उद्योगांना फायदा होणार आहे. अनुदान मिळण्यासाठी आधी असलेल्या अटीही शिथिल करण्यात आल्या आहेत. इचलकरंजी येथे केंद्र सरकारच्या योजनेतून पॉवरलूम मेगा क्लस्टर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी कापडनिर्मिती करणे, कापडाला रंग देणे, त्यावर प्रिंटिंग करणे आदी सुविधा दिल्या जात आहेत. पूर्वी ही व्यवस्था नसल्याने राज्याबाहेर कापड पाठवून त्यावरती प्रक्रिया केली जात होती.