काळम्मावाडी धरण दुरुस्तीमुळे सध्या पाण्याची कमतरता दिसत आहे. पण धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरही जर पाणी कमी पडत असेल तर अन्य पर्याय शोधू. अन्यथा इचलकरंजीला सुळकूडमधूनच पाणी घेऊ. धरण दुरुस्तीसाठी काही कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत आम्ही थांबू, पण पाणी सुळकूडचेच आणू, असे सूतोवाच आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. तर काही मंडळींकडून महापालिका आयुक्तांवर दबाव टाकून 100 शुध्द पेयजल प्रकल्प सुरु करु दिले जात नाहीत, असा टोलाही त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना लगावला.