Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : सायझिंगप्रश्नी लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालण्याची गरज

गेल्या चार दिवसापासून इचलकरंजी शहरातील जवळपास दीडशे सायझिंग बंद ठेवण्याचा परिणाम वस्त्रोद्योगावर जाणू लागला आहे अनेक यंत्रमाग कारखाने बीमा अभावी बंद पडू लागले आहेत. जर हा प्रश्न लवकर मिटला नाही तर आठ दिवसात संपूर्ण इचलकरंजीचे चक्र कोलमडणार आहे. तरी लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांनी या प्रश्नात लक्ष घालून सायझिंग उद्योग पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सायझिंग मधील दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता बाहेर पडते हा ठपका ठेवत जवळपास चार सायझिंगाचा विद्युत पुरवठा तोडण्यात आला आहे.