जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालय यांनी सबळ पुरावे अभावी उमेश उर्फ पिंटू हावगुंडे यांची निर्दोष मुक्तता केली आहे . हावगुंडे यांच्या वतीने अडवोकेट सचिन माने यांनी न्यायालयात युक्तिवाद मांडला. २६ जून 2017 ला किरकोळ कारणावरून उमेश उर्फ पिंटू हावगुंडे यांनी अमोल पांधारे यास तुला जिवंत सोडत नाही तुला खल्लास करून टाकतो असे म्हणून अचानक पॅन्टच्या खिशातून धारदार कट्टर काढून त्या कटरने अमोल पांधारे यास ठार मारण्याच्या उद्देशाने कपाळावर, नाकावर, डाव्या हातावर व उजव्या छातीवर कटरणे मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. उमेश उर्फ पिंटू हावगुंडे यांच्यावर इचलकरंजी पोलीस ठाण्यात तसा गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन उमेश उर्फ पिंटू हावगुंडे यांच्या विरोधात इचलकरंजी येथे न्यायालय दोश आरोप पत्र दाखल झाले होते. सदर केस सुनावणी वेळी जखमी फिर्यादी, पंच साक्षीदार, तपासणी अधिकारी तसेच इतर महत्त्वाच्या साक्षीदारांच्या जबाब न्यायालया समक्ष नोंदवण्यात आला. यातील जखमी फिर्यादी व साक्षीदारांच्या साक्षी मध्ये असलेली विसंगती तसेच तपासी अधिकारी यांच्या साक्षीमध्ये शिक्षा देण्यास सबळ पुरावा आलेला नाही असा बचाव आरोपी हालगुंडे तर्फे घेण्यात आला. आरोपी तर्फे वकील एडवोकेट सचिन माने यांचा युक्तिवाद धैर्य मानून इचलकरंजी जिल्हा व सत्र न्यायालय यांनी सबळ पुरावे अभावी उमेश उर्फ पिंटू हळगुंडे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.