इचलकरंजीतील शहर वाहतूक शाखा ही वाहनधारकांना शिस्त लागावी. वाहतूक सुरळीत चालावी, अतिक्रमणाने अपघात होवू नयेत, याबाबत कोणतीच कारवाई त्यांच्याकडून होताना दिसत नाही. उलट दोनचाकी वाहणांवर कायद्यावर बोट दाखवत दंडाच्या वसूलीचे काम सुरू असल्याचे काम शहरात आहे. काही चांगले काम ही तसेच वाहनधारकांना प्रबोधन वाहतूक शाखेने केले आहे. त्यावेळी याच इचलकरंजीकरांनी त्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप लावली आहे. मात्र सध्या इचलकरंजी येथे बेशिस्त वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून आशा वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे.