इचलकरंजी येथे मंगलमय वातावरणात भव्य कलश यात्रेने 108 कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्याला प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेला रथ, सवाद्य निघालेल्या कलश यात्रेत डोक्यावर कळस घेऊन हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. लालभडक भगव्या रंगाच्या एकसारख्या साड्या परिधान केलेल्या महिलांचा सहभाग कलश यात्रेत लक्षवेधी ठरला. लक्ष्मीनारायण मंदिर झेंडा चौक ते श्री. पंचगंगा विनायक मंदिर तीन किमी प्रमुख मार्गावर धार्मिक वातावरणात यात्रा काढण्यात आली.