जर तुम्ही दहावी (SSC) किंवा बारावी (HSC) उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीसाठी (Government Job) इच्छुक असाल आणि भारतीय सैन्यात भरती (Indian Navy Recruitment 2024) होण्याचे स्वप्न पाहत असाल तर, तुम्हाला भारतीय सैन्याचा भाग बनण्याची सुवर्ण संधी आहे. भारतीय नौदलाने 10+2 B.Tech प्रवेश 2024 साठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करून या भरतीमध्ये सामील होऊ शकतात. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येतो आणि कोणतेही शुल्क जमा करावे लागणार नाही.
भारतीय नौदलातील भरती
या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 20 जानेवारी 2024 या अंतिम तारखेपर्यंत भरता येईल. भारतीय नौदलात 10+2 (B.TECH) कॅडेट एंट्री स्कीम भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 12 वी उत्तीर्ण झालेल्या आणि भारतीय नौदलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलाने कार्यकारी आणि तांत्रिक शाखेच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
रिक्त पदांचा तपशील
भारतीय नौदल कॅडेट एंट्री स्कीम भरतीअंतर्गत एकूण 35 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामधील 10 पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी, बारावी परीक्षा किंवा इतर बोर्डातून समकक्ष परीक्षा पास असणे गरजेचं आहे. उमेदवाराने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (PCM) विषयांमध्ये किमान 70 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासह, उमेदवाराने जेईई मेन 2023 च्या प्रवेश परीक्षेत भाग घेतलेला असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2007 दरम्यान झालेला असावा. उमेदवाराची किमान उंची 157 सेमी पेक्षा किंवा त्याहून अधिक असावी. या भरती मोहिमेसाठी पात्रता आणि निकष याबद्दलच्या तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.