इंडिया नावाऐवजी भारत हे नाव वापरण्याच्या अघोषित मोहिमेत आता गुगलनेही उडी घेतली आहे. गुगल मॅप्सवर तुम्ही आता आपल्या देशाचं नाव सर्च केल्यास, त्याठिकाणी 'Bharat' अशा नावासह आपला तिरंगा दिसत आहे. अर्थात, यासाठी तुम्हाला सर्चदेखील भारत याच नावाने करावे लागणार आहे.गुगल मॅप्सच्या हिंदी व्हर्जनमध्ये देखील देवनागरी लिपीमध्ये 'भारत' लिहिलेलं दिसून येत आहे. तर, तुम्ही इंग्लिश व्हर्जनमध्ये इंडिया असं सर्च केलं, तर त्याठिकाणी 'India' असंच नाव दिसत आहे. या सर्व नावांसोबत 'कंट्री इन साउथ एशिया' असं एकाच प्रकारचं डिस्क्रिप्शन दिसत आहे.गुगलच्या इतर प्रॉडक्ट्समध्येही बदल
केवळ मॅप्स नाही, तर गुगलच्या इतर सेवांमध्येही इंडिया आणि भारत असे दोन्ही पर्याय उपलब्ध झाले आहेत. गुगलने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नसली, तरी सर्च रिझल्टमध्ये हे दिसून येत आहे.
इंग्रजीमध्ये दोन्ही पर्याय उपलब्ध असले, तरी हिंदीमध्ये सर्च केल्यास बहुतांश ठिकाणी गुगल 'भारत' याच नावाला प्राधान्य देत असल्याचं दिसत आहे. गुगल ट्रान्सलेटमध्ये India च्या हिंदी ट्रान्सलेशनसाठी भारत, हिंदुस्तान, भारतवर्ष असे पर्याय दिसत आहेत.जी-20 परिषदेपासूनच केंद्र सरकार बहुतांश ठिकाणी 'इंडिया' नावाऐवजी भारत नाव वापरण्याला प्राधान्य देत आहे. यातच रेल्वे मंत्रालयाने देखील आपल्या एका प्रपोजलमध्ये इंडिया ऐवजी भारत नाव वापरल्याचं वृत्त शनिवारी माध्यमांमध्ये आलं होतं. त्यानंतर आता गुगलने केलेला हा बदल पाहून सगळीकडून आश्चर्य आणि कौतुक व्यक्त होत आहे.