Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : दिवाळी खरेदीत दक्षता बाळगा: गर्दीचा फायदा चोरटे लुटण्याच्या तयारीत

सध्या दिवाळीमुळे भरलेल्या बाजारात चैतन्यमय वातावरण आहे. मात्र, याच बाजारात खरेदीला उसळणाऱ्या गर्दीचा फायदा चोरटे लुटण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वीही दिवाळी बाजारात अनेकांना भुरट्या चोरट्यांनी मोठा दणका दिल्याचे चित्र आहे. यापार्श्वभूमीवर ग्राहकांचे नुकसान टाळावे यासाठी खरेदीसाठी जाणाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. तसेच, दिवाळी कालावधीत बाजारपेठेत पोलिसांनी वेळीच उपाययोजना केल्यास चोरट्यांची दिवाळी आणि नागरिकांचे दिवाळ रोखता येईल.