इचलकरंजी शहरातील मुख्य ८० चौकांमध्ये सौरऊर्जेवर चालणारे हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वीजबिलात दरमहा लाखो रुपयांची बचत होणार आहे. यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी पाठपुरावा करून निधी मिळवल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. शहरातील पंचगंगा नदीतीरावरील वरदविनायक मंदिर, मरगुबाई मंदिर, लिंबू चौक ते शहापूरपर्यंतच्या विविध ८० ठिकाणी सौरऊर्जेवरील हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत. या कामासाठी दहा कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी केली होती.