Logo
ताज्या बातम्या

पंतप्रधानांच्या हस्ते आज १५ हजार घरकुलांचे वाटप, मोदींच्या स्वागतासाठी सोलापूरनगरी सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते १५ हजार घरकुलांचे वाटप होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी सोलापुरात ठिकठिकाणी फलक लागले आहेत. एक लाखाहून अधिक लोक मोदींच्या सभेला उपस्थित राहतील अशी तयारी करण्यात आली आहे. याप्रसंगी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजन केले, आता उद्घाटनही करणार ९ जानेवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रे नगर घरकुल प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. चार वर्षांनंतर पंतप्रधान मोदी हे प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांची कामेदेखील सुरू आहेत.