अयोध्या येथे संपन्न होत असलेल्या भव्यदिव्य अशा श्रीरामल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे रविवार 21 जानेवारी रोजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळामारुती आरती भक्त मंडळाच्या वतीने भव्य अशी शोभायात्रा व पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या शोभायात्रा व पालखी मिरवणूकीत झांजपथक, लेझीम पथकल धनगरी ढोलसह विविध प्रकारच्या पारंपारिक वाद्यांचा समावेश असणार आहे. या शोभायात्रेत सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.