Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :पंचगंगा नदीतील जलपर्णी काढण्यास येणार गती

गुरुवारी पंचगंगा नदीतील जलपर्णी काढताना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील कर्मचारी. जलपर्णी काढण्यासाठी असलेले अडथळे आज जेसीबीच्या सहाय्याने दूर करण्यात आले. त्यामुळे (ता. २९) सकाळपासून अधिक गतीने जलपर्णी काढण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे. यासाठी यांत्रिक बोटीचा वापर केला जाणार असून बोटीच्या समोर बकेट तयार केले आहे. त्यामुळे नदीपात्रातील जलपर्णी किनाऱ्यावर आणण्यास सुलभ होणार आहे. येथील पंचगंगा नदीतील पात्र जलपर्णीने झाकोळले आहे. दोन दिवस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जलपर्णी काढण्यात येत आहे.