केंद्र सरकारकडून नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी चांगली बातमी आली आहे. अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर 2023 साठी जीएसटी संकलनाची आकडेवारी आज म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी जाहीर केली. या आकडेवारीनुसार एकूण वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 13 टक्क्यांनी वाढून 1.72 लाख कोटी रुपये झाले आहे.गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये, वित्त मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली होती आणि सांगितले होते की FY 24 च्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) GST संकलनात 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जीएसटी संकलन 11 टक्क्यांनी वाढून 9.92 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले होते.काय आहेत जीएसटीचे आकडे?
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि वर्षभरात नोंदलेली ही विक्रमी वाढ आहे. ऑक्टोबरच्या या आकडेवारीसह, चालू आर्थिक वर्षातील मासिक संकलनाची सरासरी 1.66 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 11 टक्के अधिक आहे.काय आहेत जीएसटीचे आकडे?
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि वर्षभरात नोंदलेली ही विक्रमी वाढ आहे. ऑक्टोबरच्या या आकडेवारीसह, चालू आर्थिक वर्षातील मासिक संकलनाची सरासरी 1.66 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 11 टक्के अधिक आहे.