इचलकरंजी शहरातील भोने माळ परिसरात एका रेपिअर कारखान्याला आग लागली. त्यामध्ये सुमारे 40 लाखाचे नुकसान झाले. इचलकरंजी महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणले. या आगीत तीन रेपियर लुम , इलेक्ट्रिक पार्ट,सुत आणि सुताचे बिमे जळून खास झाली. यामध्ये जवळजवळ 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती घटनास्थळ मिळाली आहे. सदर घटना स्थळावर आग विझवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तसेच महापालिकेच्या अग्निशामक दलाने मोठे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.